कत्राबाद देवी
कत्राबाद देवी, मांडवगाव, तालुका – श्रीगोंदा
देवीचे मंदिर मूळतः लक्ष्मीनारायणला समर्पित आहे आणि आता देवीला समर्पित आहे. मंदिराचे पवित्र स्थान, तीन प्रवेशद्वार आहेत आणि समोर एक द्वारमंडप आहे. गर्भगृह आणि महामंडप जीर्ण जालेले असून नंतर दुरूस्ती करण्यात आलेले आहे. मंदिराच्या मुख्य भागातील खांबावर नागाच्या विविध आकृत्या आहेत. देवीची आणि लक्ष्मीनारायणची पाच फुटाची मूर्ती, या दोन्ही मूर्त्या महामंडपाच्या द्वारातून दिसतात. मंदिराच्या आतील भागापेक्षा, मंदिराच्या बाहेरील कोरीव काम कमी आहे. खांब चौकोन अष्टकोनी आणि गोल विभागांमध्ये आहेत. मंदिराची बाह्य भिंत भौमितिक आकृत्यांनी साचेबद्ध करून सुशोभित केलेली आहे. हे मंदिर १२-१३ व्या शतकातील आहे.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल:
हवाई मार्गाने
जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.
रेल्वेमार्गाने
जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.
रस्त्याने
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत