बंद करा

जिल्ह्याविषयी

मजलक अहमद याने इ.स. १४९४ मध्ये वसविलेले व निजामशाहाचे राजधानीचे शहर पुढे त्याच्याच नावाने अहमदनगर शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. जिल्ह्याचे मुख्यालय अहमदनगर शहर असल्याने जिल्ह्याला अहमदनगर हे नांव देण्यात आले. पेशवाईच्या अस्तानंतर इ.स.१८२२ मध्ये अहमदनगर जिल्हयाची निर्मिती झाली त्यावेळी अहमदनगर जिल्हयाची हद्द आताच्या नाशिक जिल्हयातील वणी तर दुस-या टोकास साप्रंत सोलापूर जिल्हयातील करमाळयापर्यंत होती. १८६९ मध्ये नाशिक व सोलापूर जिल्ह्याची निर्मिती झाल्याने वणी व करमाळा हे अहमदनगर जिल्हयातून वगळण्यात आले. पुणे महसूल विभागात असलेला अहमदनगर जिल्हा फेब्रुवारी १९८१ पासून नाशिक या नवीन महसूल विभागात समाविष्ट्ट करण्यात आला.

अधिक माहितीसाठी  (पीडीएफ, ७ एमबी)