भूविज्ञान
ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून संपूर्ण अहमदनगर जिल्हयाचा भूस्तर तयार झालेला असून तो दख्खन टापू या नांवाने ओळखला जातो. जिल्हयाच्या जमिनीचे साधारणपणे तीन भाग पडतात.
१. नदी काठची पोयटयाची पांढरट जमीन
२. डोंगराळ उतारावरची काळी दगड गोटे मिश्रित जमीन
३. पांढरट चुनखडीयुक्त ( बारड जमीन )
भुजल सव्हेक्षण विकास यंञणा अहमदनगर यांचेकडील माहितीनुसार अहमदनगर जिल्हा गोदावरी, भीमा व सीना या नद्यांच्या खो-यातील विविध ८० टक्के पाणलोट क्षेञात विभागला आहे. प्रवरा खो-यातील जमीन जास्त सुपीक आहे. पारनेर तालुक्याचा बराच भाग चुनखडीयुक्त जमिनीने व्यापलेला आहे.
रांजण खळगे निघोज
खडकाळ नदीच्या खोऱ्यात रांजणखळगे वारंवार तयार होत असतात. अकोले तालुक्यातील रावडा गावातील प्रवरा नदी पात्रात आणि पारनेर उपविभागातील खेडे निघोज या गावातून थोड्याच अंतरावर असलेले कुंड-माहुली जवळील कुकडी नदी पात्रात विशेषतः हे मोठ्या संख्येने आणि आकाराने आढळून येतात