बंद करा

घोटाण येथील जैन मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर

श्रेणी ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक/मोहक सौंदर्य, मनोरंजक

जैन मंदिरात गर्भगृह, अंतराळ, मंडप आणि मुखमंडप यांचा समावेश आहे. मंडप आणि आंतराळाची छत आणि गर्भगृहाच्या दाराचे चौकट सुंदर सजावटांसह सुशोभित केलेली आहे. सध्या जैन मंदिर म्हणून अधिसूचित असले तरी शिवलिंग गर्भगृहमध्ये स्थित आहे. मंदिर १२-१३  व्या शतकातील आहे.

मल्लिकार्जुन मंदिर १३ व्या १४ व्या बांधलेले आहे व पेशवाईच्या काळात मोठ्या प्रमाणावर त्याची दुरुस्ती केली गेली. मंदिराचा मंदिराच्या खालचा भाग दगडाने बांधलेले आहे, तर शिखर बांधकामात विटा आणि चुना वापरलेले आहे. खांबांचा
खालचा भाग आयताकृती आहेत, वरचा भागाचा आकार अष्टभुज, आयताकृतीत विभाजित करण्यात आल्या आहेत, त्याच्यावर लढणारे हत्तींच्या जोडी, घोडा वर बसलेले योद्धा, मकरमुख आणि घाटपल्लव यांचे आकृती कोरलेले आहेत.

छायाचित्र दालन

  • मल्लिकार्जुन मंदिर
  • जैन मंदिर

कसे पोहोचाल:

हवाई मार्गाने

जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.

रेल्वेमार्गाने

जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.