कळसूबाई शिखर
श्रेणी अॅडवेन्चर, नैसर्गिक/मोहक सौंदर्य, मनोरंजक
कळसूबाई हा अकोला तालुक्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचा सर्वोच्च शिखर असलेला पर्वत आहे. उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसबाई शिखराची उंची १६४६ मीटर (किंवा ५४०० फीट्स) आहे. हे सर्वप्रथम महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. कळसूबाई शिखर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहेत.
शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल:
हवाई मार्गाने
जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.
रेल्वेमार्गाने
जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.
रस्त्याने
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.