बंद करा

रेहकुरी  काळवीट अभयारण्य

श्रेणी ऐतिहासिक, धार्मिक

रेहकुरी गाव कर्जत तालुक्यातील अहमदनगर शहरापासून सुमारे ८०  किमी अंतरावर स्थित आहे. रेहकुरी दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राणी काळवीट  च्या अभयारण्यचे निवासस्थान आहे.अभयारण्य रेहकुरी ब्लॅक बक अभयारण्य या नावाने ओळखला जातो.

संपूर्ण रेहकुरी  काळवीट अभयारण्य २.१७  चौ. कि. च्या क्षेत्रात पसरलेले आहे.  या अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ उन्हाळ्याच्या मोसमात आहे,  हे अभयारण्य वर्षभर खुले असते .

असा अंदाज आहे की आज या अभयारण्यामध्ये ४०० ते ५०० भारतीय काळवीट आहेत.

कसे पोहोचाल:

हवाई मार्गाने

जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.

रेल्वेमार्गाने

जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.