बंद करा

रतनगड

श्रेणी ऐतिहासिक, धार्मिक

रतनवाडीपासून ६ किलोमीटर अंतरावर, भंडारदरापासून २३ किमी, पुणे पासून १८३ किमी आणि मुंबईपासून १९७ किमी अंतरावर असलेल्या रतनगड हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात एक प्राचीन किल्ला आहे. रतनगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारादरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे.

हा किल्ला ४२५० फुट उंचीवर आहे. रतनगडचा किल्ला,  ४०० वर्षांपूर्वीचा किल्ला  शिवाजी महाराज यांनी वापरला होता.

किल्ल्याला गणेश, हनुमान, कोकण आणि त्र्यंबक हे चार प्रवेशद्वार आहेत
किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते डिसेंबर आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सामरद या गावातून पुढे दीड ते दोन किमी अंतरावर ,भंडारदरा भागाच्या पश्चिम बाजूला संदन दरी आहे.पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर इथे गर्दी असते.

संदन दरीतल्या वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही. समोर आजोबा पर्वत, रतन गड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही संदन दरीची सैर करणे एक स्मरणीय अनुभव आहे . आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी असा या दरीचा लौकीक असल्याचं सांगितलं जातं.

छायाचित्र दालन

  • रतनगड वरील ट्रेकिंग
  • रतनगडचे पूर्ण दृश्य
  • रतनगड वरील हिरवळ

कसे पोहोचाल:

हवाई मार्गाने

जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.

रेल्वेमार्गाने

जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.