खर्डा किल्ला
श्रेणी ऐतिहासिक, धार्मिक
खर्डा किल्ला, तालुका जामखेड , खर्डा म्हणजे पूर्वीचे शिवपटटण. ११ मार्च १७९५ रोजी मराठयांनी याच ठिकाणी निजामावर विजय मिळविला, त्या घटनेची साक्ष देत खर्डा किल्ला आजही उभा आहे. हा किल्ला १७४५ मध्ये सरदार निंबाळकर यांनी बांधला. या किल्ल्याची तटबंदी, प्रवेशदार अद्याप सुस्थितीत असून आतमध्ये एक बारव व मशिद आहे. गांवामध्ये १२ ज्योतिर्लिंग असून श्रावणात येथे भाविकांची मोठी गर्दी असते.
कसे पोहोचाल:
हवाई मार्गाने
जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.
रेल्वेमार्गाने
जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.
रस्त्याने
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.