बालेश्वर आणि लक्ष्मीनारायण मंदिर

बालेश्वर आणि लक्ष्मीनारायण मंदिर, पेडगाव तालुका श्रीगोंदा

बाळेश्वर मंदिर (पेडगांव)
बाळेश्वर हे मंदिर शिव यांना समर्पित केलेले आहे. येथे गर्भगृह, अंतराळ आणि महामंडप आहे. हे मंदिर  लक्ष्मीनारायण मंदिराच्या पश्चिमेला स्थित असून पूर्वाभिमुख आहे. मंदिर 12-13 व्या शताब्दीमध्ये बांधलेले  आहे.सध्याहे मंदिर शिखर नसलेल्या पण  खांबांनी वेढलेल्या मोकळ्या जागे सारख्या अवस्थेत आहे.सभागृहाचे खांब सुरेख रचनांनी कोरलेले आहेत. मुख्यद्वार फुले आणि भूमितीय  आकृत्यांनी सुशोभित केलेले आहे. मंदिराच्या बाह्य भिंती देवदेवतांची प्रतिमांनी सुंदर रूपाने कोरलेले आहेत.

लक्ष्मीनारायण मंदिर (पेडगांव)
इ. स.1689 मुगलांनी पेडगाव  एक महत्वाचे ठाणे बनवलेले होते. 11-12 व्या शतकातील  चार मंदिराचे  लक्ष्मीनारायण, बालेश्वर, मल्लिकार्जुन किंवा मुंडेश्वर आणि भैरवनाथ अवशेष सुरक्षित ठेवणे बाबतसूचित केले. लक्ष्मीनारायण, बालेश्वर  मंदिर भीमा नदीच्या डाव्या किनार्यावर वसलेले आहेत.

लक्ष्मीनारायण मंदिर हे एकसमान आकाराचे आणि सुंदर शिल्पकृतींनी बनवलेले आहे. येथे गर्भगृह, अंतराळ,मुख्यमंडप आणि महामंडप आहे. महामंडपाला  पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेने प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या बाहेरील पृष्ठभागावर शिव, विष्णु आणि अष्टदिकपाळ यांच्या विविध प्रकारची  शिल्पे कोरलेली आहेत.मंदिरातील खांबांवर झाडाच्या पानाफुलांच्या आकृत्यांनी सुशोभित केलेली आहेत.

 

 

छायाचित्र दालन

  • मंदिराच्या भिंतीवरील मूर्ती
  • मंदिरावरील कोरीवकाम
  • पूर्ण मंदिराचे दृश्य

कसे पोहोचाल:

हवाई मार्गाने

जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.

रेल्वेमार्गाने

जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत