भूविज्ञान
ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून संपूर्ण अहमदनगर जिल्हयाचा भूस्तर तयार झालेला असून तो दख्खन टापू या नांवाने ओळखला जातो. जिल्हयाच्या जमिनीचे साधारणपणे तीन भाग पडतात.
- नदी काठची पोयटयाची पांढरट जमीन
- डोंगराळ उतारावरची काळी दगड गोटे मिश्रित जमीन
- पांढरट चुनखडीयुक्त ( बारड जमीन )
भुजल सव्हेक्षण विकास यंञणा अहमदनगर यांचेकडील माहितीनुसार अहमदनगर जिल्हा गोदावरी, भीमा व सीना या नद्यांच्या खो-यातील विविध 80 टक्के पाणलोट क्षेञात विभागला आहे. प्रवरा खो-यातील जमीन जास्त सुपीक आहे. पारनेर तालुक्याचा बराच भाग चुनखडीयुक्त जमिनीने व्यापलेला आहे.
रांजण खळगे निघोज

रांजण खळगे , निघोज
खडकाळ नदीच्या खोऱ्यात रांजणखळगे वारंवार तयार होत असतात. अकोले तालुक्यातील रावडा गावातील प्रवरा नदी पात्रात आणि पारनेर उपविभागातील खेडे निघोज या गावातून थोड्याच अंतरावर असलेले कुंड-माहुली जवळील कुकडी नदी पात्रात विशेषतः हे मोठ्या संख्येने आणि आकाराने आढळून येतात