बंद करा

मतदान जागृतीसाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांचा 19 मार्च 2019 रोजी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद

18/03/2019 - 25/03/2019

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्व पात्र मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा , यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या वतीने मतदारांची जागृती करण्यात येत आहे . त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार , दिनांक 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत . येथील न्यू आर्टस , कॉमर्स अॅन्ड सायन्स महाविद्यालयात सकाळी १० वाजता हा ‘टॉक वुईथ कलेक्टर’ कार्यक्रम होणार आहे . मतदानजागृतीचा (स्वीप) एक भाग म्हणून यावेळी शहर व जिल्ह्यातील कला , क्रीडा , संस्कृती , सामाजिक असा विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या नामवंतांना मतदारदूत म्हणून गौरवले जाणार आहे . त्यांच्याकडे मतदानाबाबत विविध स्तरात जनजागृती करण्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ३७-अहमदनगर आणि ३८- शिर्डी (अ.जा.) लोकसभा मतदारसंघात अनुक्रमे २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी मतदान घेण्याचे जाहीर केले आहे . या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा , यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा कार्यरत आहे . विविध उपक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्काबाबतची जाणीव करुन दिली जात आहे . निवडणूक घोषित होण्यापूर्वी मतदारनोंदणी अभियानाच्या माध्यमातून जिल्हाभर विविध उपक्रम राबविले गेले . आता प्रत्येक पात्र मतदाराने त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा , यासाठी जनजागृती करण्यात येत आहे . जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुढाकार घेतला असून विविध घटकांपर्यंत मतदानाचे महत्व अधोरेखीत केले जाणार आहे . या उपक्रमाचाच एक भाग म्हणून ‘टॉक वुईथ कलेक्टर’ अर्थात जिल्हाधिका-यांशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन न्यू आर्टस महाविद्यालयात करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देणार आहेत. त्याचबरोबर मार्गदर्शनही करणार आहेत. स्वीपचे नोडल अधिकारी संजय कदम यांच्यासह स्वीपची संपूर्ण टीम नव्या नव्या उपक्रमांसह मतदार जनजागृतीसाठी प्रयत्नशील आहे.

मतदान जागृतीसाठी जिल्हाधिकारी यांचा मुक्त संवाद (व्हिडिओ )