Close

2 August 2023 – Yuva Samvad

नगर तालुक्यात महसूल सप्ताह निमित्त दुसऱ्या दिवशी दिनांक २ ऑगस्ट २०२३ रोजी युवा संवाद निमित्त न्यू आर्टस् कॉलेज येथे मा.जिल्हाधिकारी सर  विद्यार्थ्यांशी युवा संवाद साधण्यात आला.

श्रीरामपूर तालुक्यात महसूल सप्ताह निमित्त दुसऱ्या दिवशी दिनांक २ ऑगस्ट २०२३ रोजी युवा संवाद निमित्त एकूण ६ महाविद्यालयांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी महसूल विभाग, महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, मतदार नोंदणी याबाबत युवा संवाद साधण्यात आला.

संजीवनी कॉलेज कोपरगाव येथे युवा संवाद व नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम घेण्यात आले.

दिनांक २ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १ वाजता अहमदनगर शहरातील एका ९३ वर्षीय आज्जी ची अत्यंत हलाखी परिस्थिती असून आधाराची गरज असल्या बाबत माहिती मिळाल्यानंतर शहर संगायो तलाठी श्री गणेश आगळे यांना निरोप दिला होता त्यांनी सायंकाळी ६ वाजता प्रत्यक्ष गृहभेट घेऊन त्यांना घरपोच रेशन कार्ड उपलब्ध करून दिले आहे. तसेच त्यांचा श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचा फॉर्म भरून घेतला आहे.

पदव्युत्तर महाविद्यालय,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत महसूल सप्ताह निमित्त आयोजित शिबिरामध्ये नव मतदार नोंदणी संबंधी जागृती करण्यात आली या कार्यक्रमास सौ सुनंदा मरकड मंडळ अधिकारी बारगाव नांदूर, तालुका राहुरी यांचे मार्गदर्शन लाभले व त्यांनी महसूल योजना संबंधीही माहिती दिली. या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर व्ही एस पाटील विद्यार्थी कल्याण अधिकारी पदव्युत्तर महाविद्यालय यांनी केले.

महसूल सप्ताह निमित्त आयोजित शिबिरामध्ये  दादापाटील महाविदयालय , कर्जत येथे १०० डोमिसाईल व ईतर दाखले वाटप तसेच २५५ मतदार नोंदणी करण्यात आले.

महसुल सप्ताहनिमीत्त महसुल अदालत घेवुन भुसंपादन निवाडयातील ४ प्रकरणात समेट व १.७५ कोटी मोबदला वाटप करण्यात आले.

महसूल सप्ताह निमित्ताने २ ऑगस्ट २०२३ रोजी युवा संवाद अंतर्गत मौजे गुहा येथिल गंगाधर बाबा अनाथ आश्रमामध्ये अनाथ बालकांना अनुज्ञेय लाभ देणेसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले.महसूल विभागाच्या संजय गांधी योजनेसाठी ३६ अनाथ बालकाची निवड करण्यात आली. तसेच त्यापैकी 8 अनाथ बालकांच्या कागदपत्रांची पूर्तता तात्काळ झाल्याने संजय गांधी योजना लाभ मंजुरीचे आदेश वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रमास मा.श्री.शाहुराज मोरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अहमदनगर, मा.श्री.किरण सावंत पाटील उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर भाग व मा.श्री.चंद्रजित राजपूत तहसीलदार, नायब तहसीलदार राहुरी हजर होते.

एसव्हीएनएचटीएस कॉलेज ऑफ बी.फार्मसी, राहुरी फॅक्टरी येथे युवा संवाद कार्यक्रम घेण्यात आले.