बंद करा

३ ऑगस्ट २०२३ – एक हात मदतीचा

महसूल सप्ताह निमित्त तिसऱ्या दिवशी दिनांक ३ ऑगस्ट २०२३ रोजी आपदा मित्रांना किट वाटप करण्यात आले.

महसूल सप्ताह निमित्त तिसऱ्या दिवशी दिनांक ३ ऑगस्ट २०२३ रोजी कर्जत तालुक्यात १० मंडळात फेरफार अदालत घेऊन १०० फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या.

कर्जत उपविभागीय स्तरावर महसुल अदालत – भुसंपादन १ व ३ महसुली दाव्यांत समझोता करण्यात आला.

महसूल सप्ताह अंतर्गत मौजे ढवळपुरी तालुका पारनेर येथे E KYC तसेच ई हक्क प्रणाली बद्दल माहिती देण्यात आली तसेच ई हक्क मधुन नोंदी झाल्या नंतर तयार पोहच देण्यात आले.

दुर्गम भाग पिंपळगाव खांड येथे ६० उत्पन्नाचे दाखले वाटप केले आहेत.

दिनांक २ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १ वाजता अहमदनगर शहरातील एका ९३ वर्षीय आज्जी ची अत्यंत हलाखी परिस्थिती असून आधाराची गरज असल्या बाबत माहिती मिळाल्यानंतर शहर संगायो तलाठी श्री गणेश आगळे यांना निरोप दिला होता त्यांनी सायंकाळी ६ वाजता प्रत्यक्ष गृहभेट घेऊन त्यांना घरपोच रेशन कार्ड उपलब्ध करून दिले आहे. तसेच त्यांचा श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचा फॉर्म भरून घेतला आहे.

कोपरगाव तालुका पूर आपत्ती व्यवस्थापन तहसील कार्यालय कोपरगाव यांच्या मार्फतीने आज दि ३ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ४.३० वाजता शुक्र तीर्थ घाट गोदावरी नदी कोपरगाव येथे आपदा मित्र श्री सागर पवार रा. पढेंगाव व इतर आपदा मित्रांनी विद्यार्थी /विद्यार्थिनी व उपस्थित नागरिकांना पुरापासून संरक्षण कसे करावे याबाबत लाईफ जॅकेट परिधान करून प्रत्यक्षिक दाखविताना मा अपर तहसीलदार श्री विकास गंबरे, अ. का श्री कुलथे, अ. का लांघी कोतवाल  उपस्थित होते.