आशियातील पहिले औद्योगिक सहकारी उपक्रम
अहिल्यानगर, राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यामध्ये एकूण १९ साखर कारखाने आहेत आणि सहकारी चळवळीचे जन्मस्थान आहे. साखर, दूध आणि बँक सहकारी संस्था येथे भरभराट करतात. अगदी १०० वर्षांपूर्वी, दूरदृष्टी असलेली एक महान व्यक्ती महाराष्ट्राच्या भूमीत जन्मली. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील हे या दूरदृष्टी व्यक्तीचे नाव. सहकारी चळवळीचे अग्रगण्य असलेल्या त्यांना , त्यांच्या योगदानासाठी पदमश्री देण्यात आली. महाराष्ट्रातील अहिल्यानगरमधील दुष्काळग्रस्त जिल्ह्यात (पश्चिम भारतात) एक सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ग्रामीण जनतेच्या दयनीय अवस्थेमुळे ते अस्वस्थ झाले.
पण गरीब ग्रामीण लोकांमध्ये असलेल्या प्रचंड ताकदीची त्यांना जाणीव होती. जिचा उपयोग ग्रामीण जनतेमधील दारिद्र्य, निरक्षरता, रोग आणि निष्क्रियता याच्याशी लढा देण्याकरता वापरून त्यावर नियंत्रण ठेवता येईल याची त्यांना जाणीव होती. औपचारिक शिक्षणाचा अभाव त्यांना त्यांनी निवडलेल्या मार्गावरून हटवू शकला नाही. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि श्री. वैकुंठभाई मेहता तसेच श्री डी.डी. गाडगीळ, यांच्या सहकार्याने आशियातील प्रथम औद्योगिक सहकारी उपक्रम – प्रवरा साखर कारखाना सुरू झाला. एक लहान पाऊल म्हणून सुरुवात झाली, आणि लवकरच एक दृष्टीकोन विकसित झाला जो की एकात्मिक ग्रामीण विकासातील प्रवरा मॉडेल म्हणून मोठ्या प्रमाणावर ओळखला गेला.
त्यांनी शेतकऱ्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचे उत्थान करण्यासाठी प्रवरानगर येथे प्रथम साखर कारखाने स्थापन केले.